Cut-off Checker

कट-ऑफ तपासा (Cut-off Checker)

तुमचे गुण आणि प्रवर्गानुसार कट-ऑफ टाका. तुम्ही कट-ऑफच्या वर आहात की खाली आणि किती गुणांच्या फरकाने, हे हे टूल लगेच दाखवते. गेल्या वर्षीचा किंवा जाहीर झालेला कट-ऑफ वापरून तुमच्या शक्यतांचा अंदाज घ्या.

कट-ऑफ म्हणजे काय?

कट-ऑफ म्हणजे पुढील फेरीसाठी किंवा निवडीसाठी आवश्यक असलेले किमान गुण. हे गुण परीक्षेतील रिक्त जागा, उमेदवारांची संख्या, प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी आणि प्रवर्गानुसार आरक्षणावर अवलंबून असतात.

हे टूल कसे वापरावे?

  1. तुमचे गुण टाका आणि तुमचा प्रवर्ग निवडा.
  2. तुम्हाला माहीत असलेल्या प्रवर्गांचे कट-ऑफ भरा. सर्वच भरणे आवश्यक नाही.
  3. “कट-ऑफशी तुलना करा” दाबा. तुमच्या प्रवर्गासाठी वर/खाली आणि इतर प्रवर्गांशी फरक दिसेल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

कट-ऑफपेक्षा वर असलो म्हणजे निवड पक्की का?

नाही. कट-ऑफ ओलांडणे ही पात्रतेची पायरी असते. पुढे मेरिट, कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक/वैद्यकीय चाचणी असू शकते.

कट-ऑफ कुठे मिळतो?

निकालासोबत अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होतो. अंदाजासाठी मागील वर्षांचे कट-ऑफ वापरता येतात.

नकारात्मक फरक आला तर?

तुमचे गुण त्या प्रवर्गाच्या कट-ऑफपेक्षा कमी आहेत. पुढील संधी, राखीव यादी किंवा इतर परीक्षांचा विचार करा.

इतर टूल्स

Scroll to Top